पुणे मुंबई आणि गोवा येथील अपयशी उपचारानंतर.. लग्नाच्या २३ वर्षानंतर कोल्हापुरातील कुसूम फर्टिलिटी सेंटर मध्ये आई बाबा होण्याचे त्यांचे स्वप्न साकारले.!

आई बाबा होणे, हे लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याने आपल्या मनाशी जपलेलं सुंदर स्वप्न.! मात्र काहीजणांच्या बाबतीत नैसर्गिकरीत्या आई बाबा होण्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी असतात. पण आजघडीला विज्ञानाच्या कृपेने आधुनिक उपचारांच्या सहाय्याने या अडचणी दूर करून आई बाबा होण्याचा अनमोल आनंद मिळविता येतो. ही गोष्ट आहे अशाच एका दाम्पत्याची.. कोल्हापुरातील कुसूम फर्टिलिटी सेंटर मधील IVF उपचारांनी आई बाबा बनलेल्या एका जोडप्याची.!
सौ व श्री अनिता सचिन मुळे हे बीड जिल्ह्यातील गेवराई इथे राहणारे एक आनंदी जोडपे.. एकमेकांच्या सोबतीने दृष्ट लागावा इतकं सुंदर जीवन जगणारे हे दोघे नवरा बायको.. पण लग्नानंतर बरीच वर्षे मुलबाळ नसल्याची खंत मात्र त्यांना सतावत होती. दिवसेंदिवस या दुःखाची तीव्रता वाढतच होती. आई बाबा होण्यासाठी मित्र परिवार आणि नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी अनेक उपाय केले. अगदी पुणे, मुंबई आणि गोव्यातल्या अनेक नामांकित ठिकाणी उपचार घेतले. पण आई बाबा होण्याची त्यांची इच्छा काही फलद्रूप झाली नाही. हे सर्व करता-करता लग्नाला २३ वर्षे झाली. वयाच्या ४३ वर्षापर्यंत आई होण्यासाठी वाट पहिल्यानंतर त्यांना असे वाटले की, आता आई बाबा होण्याचे आपले स्वप्न पूर्ण होणार की नाही ? कधी वाटे आता आयुष्याच्या या टप्प्यावर आई बाबा होणे कठीण तर कधी वाटे होईल एखादा चमत्कार आणि बोबडे बोल बोलणारे, दुडूदुडू धावणारे बाळ आपल्याही अंगणात खेळेल.
कधी स्वप्न पूर्ण होण्याची आशा, तर कधी घोर निराशा अशा पद्धतीने त्यांचा आयुष्याचा प्रवास सुरु होता. दिवसामागून दिवस जात होते. अशातच एक दिवस कुसूम फर्टिलिटी सेंटरमधील IVF उपचार घेऊन आई बाबा बनलेल्या त्यांच्या ओळखीतील एका जोडप्याची गोष्ट ऐकण्यात आली. त्यांना भेटल्यावर पुन्हा एकदा त्यांच्या स्वप्नाला आशेची पालवी फुटली आणि मनात अनेक शंका-कुशंका भीती घेऊन ते कोल्हापूरमध्ये शाहूपुरी येथील कुसूम फर्टिलिटी सेंटरमध्ये वंध्यत्व चिकित्सा तज्ञ डॉ अमरनाथ सेलमोकर यांना भेटले. डॉ अमरनाथ यांनी त्यांच्या मनातील साऱ्या शंकाचे निरसन केले आणि तुमचे आई बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते हा आशावाद पुन्हा एकदा त्यांच्या जीवनात रुजविला. IVF उपचारांसाठी आवश्यक त्या सर्व तपासण्या आणि इतर गोष्टी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावरील उपचारांची दिशा ठरविण्यात आली. त्यांचे आयुष्य आता एका अगदी महत्वाच्या वळणावर येऊन ठेपले होते.
ठरविल्याप्रमाणे त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. साऱ्या गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर डॉ अमरनाथ सेलमोकर, डॉ अर्चना सेलमोकर आणि त्यांच्या टीम ने IVF उपचार प्रक्रियेतील एक-एक टप्पा पूर्ण केला आणि लग्नाच्या तब्बल २३ वर्षांनतर वयाच्या ४३ व्या वर्षी सौ अनिता यांना “गुड न्यूज” मिळाली. आजवर अनेक ठिकाणी फिरून, यापूर्वीच्या तब्बल ५ वेळा पुणे मुंबई आणि गोवा येथील अयशस्वी उपचारानंतर कोल्हापूरमधील कुसूम फर्टिलिटी सेंटरमधील IVF उपचार प्रक्रिया यशस्वी झाली. यथावकाश ९ महिने पूर्ण झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशा निरोगी जुळ्या मुलांची प्राप्ती झाली. लग्नानंतर जवळपास अडीच दशकांच्या प्रतीक्षेनंतर आई बाबा होण्याचे त्यांचे स्वप्न “सब्र का फल दो गुना मिठा होता है” या न्यायाने सत्यात उतरले.
आणि अशा रीतीने जवळ - जवळ संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यातल्या अयशस्वी प्रवासानंतर, त्यांच्या आई बाबा होण्याच्या गोष्टीचा सुखद आणि आनंददायी शेवट कोल्हापुरातील कुसूम फर्टिलिटी सेंटरमध्ये झाला आणि एका जोडप्याची आई बाबा होण्याची ही गोष्ट सुफळ संपूर्ण झाली.